
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणीतील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्याप्रकरणी आमदार सुहास बाबर व आमदार गोपीचंद पडळकर समर्थकांनी एकमेकांवर हस्तक्षेपाचा आरोप केला आहे. या दोन्ही गटांकडून आमदारांच्या कॉल डिटेल्सच्या तपासणीची मागणी करण्यात आली आहे. भाजप तालुकाध्यक्षांकडून आमदार सुहास बाबर यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप केला. तसेच बाबर यांच्या कॉल रेकॉर्डची तपासणी करावी, अशा मागणीचे निवेदन भाजपकडून देण्यात आले आहे. तर शिंदे गटाकडून गोपीचंद पडळकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांचे कॉल डिटेल्स गृहविभागाने मागवावेत, अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आता केली जात आहे. याबाबत आटपाडी पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे.