बातमी
भल्या पहाटे अजित पवारांनी हिंजवडी आयटी पार्कची पाहणी; गुन्हे दाखल करण्याचे आदेश!

रविवारी सकाळी सहा वाजेपासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे हिंजवडी आयटी पार्क येथे विविध समस्या सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. या परिसरातील सोसायटी पदाधिकारी तसेच नागरिकांनी मंत्रालयात आयोजित बैठकीला हजेरी लावली होती. त्याप्रसंगी विविध उपयोजनावर चर्चा झाली होती त्याचाच एक भाग म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भागात पाहणी केली. पावसाचे साचणारे,पाणी रस्त्याची समस्या वाहतूक कोंडी यावर उपाययोजना करण्याचे सूचना करण्यात आल्या तसेच अतिक्रमण करणारे व सरकारी रस्ता अडविणारे यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना करण्यात आल्या.