काँग्रेसला खानदेशात मोठा धक्का! कुणाल पाटलांचा भाजप प्रवेश फायनल

माजी आमदार कुणाल पाटील यांच्या भाजपा प्रवेशाने खानदेशातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे,पाटील यांनी त्यासंबंधी आज दुपारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता त्यात त्यांनी मते जाणून घेतली कार्यकर्त्यांनीही त्यांच्या सोबत असल्याचे सांगितले.
कुणाल पाटील हे धुळे ग्रामीणचे दोन वेळा विजयी आमदार, काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष, शिक्षण आणि सामाजिक कार्यात सक्रिय, आणि पुढील निवडणूक आणि पक्षांतर्गत रणनीतीत केंद्रबिंदू ठरले आहेत. सध्या त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत चर्चा सुरु असून त्याच्या परिणामांचे अवलोकन राजकीय दृष्ट्या महत्वाचे ठरणार आहे.
नुकतीच पाटील यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश करण्याबद्दल संकेत दिले आहेत, आणि त्यांनी भाजपचे नेते रवींद्र चव्हाण व जयकुमार रावल यांची भेट घेतली आहे
धुळे ग्रामीण विधानसभेचे माजी आमदार तसेच महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांचा भाजप प्रवेश ३ जुलै ला मुंबईत होणार असल्याचे बोलले जात आहे.