क्राईम

सियाचे प्रेमप्रकरण ते लोहगडावरील केतनचा खून! A To Z स्टोरी

पुणे जिल्ह्याच्या लोणावळा जवळील लोहगडावर ट्रेकिंगसाठी गेलेला बड्या व्यावसायिकाचा मुलगा केतन अग्रवालच्या मृत्यू प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळालं आहे. सुरुवातीला अपघाती मृत्यू वाटणाऱ्या या घटनेत पोलीस तपासात ही हत्या असल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही हत्या दुसरी तिसरी कुणी नव्हे तर केतनच्या होणाऱ्या पत्नीनेच केल्याची माहिती समोर आली. तिने केतनला नेमकं कसं संपवलं? याची माहिती आता पोलिसांनी दिली आहे.पोलीस अधिकारी संदीप सिंह गिल्ल यांनी पत्रकार परिषद घेत लोहगड हत्या प्रकरणाचा खुलासा केला आहे. केतन अग्रवालची होणारी पत्नी सिया गोयलने आपला प्रियकर चेतन चौधरी याच्या मदतीने ही हत्या घडवून आणल्याची माहिती दिली आहे. एका बड्या बिझनेसमनच्या मुलाची अशाप्रकारे हत्या केल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.१८ जूनला केतन अग्रवाल नावाचा तरुण लोहगड किल्यावरून पडल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. या घटनेनंतर मयत केतन आणि सियाचे कुटुंब घटनास्थळी गेले. त्याच दिवशी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेचा जेव्हा पोलिसांनी तपास केला, तेव्हा काही बाबी संशयास्पद आढळल्या. जेव्हा यांच्या नातेवाईकांशी संवाद साधला, तेव्हा ही घटना अचानक होणं, शक्य नाही, असं आम्हाला समजलं. कारण केतन हा चांगला ट्रेकर होता, त्याने विविध गडकिल्ल्यावर ट्रेकींग केलं होतं यानंतर मयताच्या कुटुंबाने देखील यावर संशय व्यक्त केला. यानंतर तांत्रिक पुरावे आणि काही साक्षीदारांच्या मदतीने पोलिसांनी तपास केला. तेव्हा केतनची होणारी पत्नी सिया गोयलचा मित्र चेतन चौधरी याचं नाव समोर आलं. सिया गोयलच्या वडिलांचा जिथे व्यवसाय आहे, तिथेच या चेतन चौधरीच्या कुटुंबाचा देखील व्यवसाय आहे. दोघंही मागील एक वर्षापासून एकमेकांना ओळखत होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. यातूनच या दोघांनी प्लॅन केला.घटनेच्या दिवशी केतन आणि सिया लोहगडावर फिरायला गेले होते. याच वेळी प्रियकर चेतन त्यांचा पाठलाग करत होता. दरम्यान, लोहगडावर फिरत असताना चेतन आणि सियाने केतनला धक्का दिला. यात केतनचा ४०० फूट दरीत कोसळून मृत्यू झाला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »