
सुपारी आणि ईडीच्या चौकशीचा इशारा
मनोज जरांगे यांचे माजी सहकारी अमोल खुणे यांनी आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा केला आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना थेट म्हटले की, आंदोलनासाठी पैसे कुणी दिले, कसे आणले आणि ते कुठे ठेवले याचा तपास झाला पाहिजे.
अमोल खुणे यांनी अत्यंत खळबळजनक दावा करताना सांगितले की, शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांना बदनाम करण्यासाठी मनोज जरांगे यांनी आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून 6 कोटी रुपयांची सुपारी घेतली होती.
अमोल खुणे यांनी कोणत्याही मंत्री किंवा आमदाराचे थेट नाव घेण्याचे टाळले असले, तरी ईडी (ED) आणि इतर तपास यंत्रणांच्या चौकशीत या सर्व गोष्टींचा हिशेब समोर येईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या दाव्यांमुळे मराठा आरक्षण आंदोलनाच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, खुणे यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.



