बातमी
तुकाराम मुंडेंची पुन्हा बदली! राज्यात खळबळ

आपल्या कडक आणि तडजोड न करणाऱ्या कार्यपद्धतीमुळे नेहमीच चर्चेत राहणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या संभाव्य बदलीच्या चर्चांनी पुन्हा एकदा राज्यात मोठे वादळ निर्माण केले आहे.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य विजय सागर यांनी सांगितले की, तुकाराम मुंढे यांची कारवाई ग्राहकांच्या हिताची असून त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. व्यापारी वर्गाकडून त्यांच्या बदलीसाठी सरकारवर दबाव आणला जात असल्याची चर्चा आहे. मात्र सरकारने अशा कोणत्याही दबावाला बळी पडू नये, अशी मागणी त्यांनी केली.



