दिल्लीतील मोठी बातमी भाजप कोणाला संधी देणार?
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कोर कमिटीची बैठक दिल्लीत रात्री उशिरा संपन्न झाली यात महाराष्ट्रातील जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याचे सूत्रांच्या माहितीनुसार समजते. यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही जागा अदलाबदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या बैठकीत राज्यातील महत्त्वपूर्ण मतदार संघात जागा बदल होणार आहे यात बीड मधून पंकजा मुंडे पुण्यातून मुरलीधर मोहोळ कोल्हापुरातून समरजित घाटगे यांना उमेदवारीची संकेत आहेत यात समरजित घाटगे यांना धनुष्यबाण चिन्हावर लढण्यासाठी आग्रह केला जाणार आहे त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शाहू छत्रपती महाराजांना उमेदवारी दिली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर मधून केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी लोकसभा निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ही जागा शिंदे गटाला दिली जाणार आहे.