समरजित घाटगे यांचं ठरलं! हाती घेणार तुतारी!
रामकृष्ण हरी वाजवा तुतारी म्हणत कागलमधील लोक माझ्याकडे येत आहेत असे मत कागलचे समरजित घाटगे यांनी मांडले आहे . दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मला भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर आमच्या भेटी झाल्या. परंतु, तुमच्या शिवाय मी अंतिम निर्णय घेऊ शकत नाही. त्यासाठी आज मेळावा घेतला आहे, असे सांगून शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी कार्यकर्त्यांना तीन प्रश्न विचारले, निवडणूक लढवायची का ? अपक्ष की तुतारी चिन्हावर लढवायची? आताच तुतारी हाती घ्यायची का ? यावर कार्यकर्त्यांनी आताच तुतारी हाती घेण्याचा एकमु होकार दिला.समरजितसिंह घाटगे यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज दुपारी चार वाजता येणार आहेत. आज घाटगे गटाचा जाहीर मेळावा सुरू असतानाच जयंत पाटील यांचा फोन आला आणि त्यांनी आज दुपारी चार वाजता भेटीचे निमंत्रण दिले आहे. त्यामुळे घाटगे गटाचा सुरू असलेल्या मेळावा चार वाजेपर्यंत चालणार आहे. या मेळाव्याचे रूपांतर पक्षप्रवेशात होण्याची शक्यता आहे. जयंत पाटील मुंबईहून विमानाने थेट शाहू सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर येत असून समरजीत सिंह घाटगे यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश होणार आहे.