बातमी

जळगाव जिल्हा परिषदेत लाचखोरीचे प्रकरण! उपविभागीय अभियंता शिसोदे आणि कनिष्ठ अभियंता चवरे ACB च्या जाळ्यात; दोघांना अटक

जळगाव : जळगाव जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील लाचखोरीचे प्रकरण समोर आले असून, या प्रकरणात उपविभागीय अभियंता शिसोदे आणि कनिष्ठ अभियंता चवरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. या कारवाईमुळे जिल्हा परिषद प्रशासनात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कंत्राटदाराच्या कामाचे बिल मंजुरीसाठी पुढे पाठविण्याच्या मोबदल्यात संबंधितांकडून १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर तडजोडीअंती १० हजार रुपये देण्याचे ठरल्याची माहिती समोर आली.

या प्रकाराची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचला. या कारवाईत उपविभागीय अभियंता शिसोदे आणि कनिष्ठ अभियंता चवरे यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

शासकीय कामांच्या बिलांवर स्वाक्षरी आणि मंजुरीसाठी कंत्राटदारांकडून पैशांची मागणी होत असल्याच्या या आरोपामुळे बांधकाम विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

दरम्यान, या प्रकरणात आणखी कोणती माहिती समोर येते आणि तपासात कोणते नवे खुलासे होतात, याकडे जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »