
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस हे हुशार आणि प्रामाणिक राजकारणी आहेत. त्यामुळे देवेंद्र यांना भविष्यात केंद्रात मोठी जबाबदारी मिळू शकते, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांचं कौतुक केलं आहे
गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘महाराष्ट्र नायक’ या कॉफी टेबल पुस्तकात ठाकरेंनी गौरवोद्गार काढल्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. फडणवीसांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यपालांच्या हस्ते पुस्तकाचं विमोचन करण्यात आलं. याशिवाय अजित पवार, एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण, गिरीश महाजन, नितीन गडकरी यांचेही लेख पुस्तकात आहेत