उद्धव साहेब आमच्या सोबत या मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरे यांना दिली खुली ऑफर!

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ काही दिवसात संपन्न होणार आहे त्या निमित्ताने त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन विधान परिषदेतील सभागृहात केले होते याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हे उपस्थित होते याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या बद्दल मनोगत व्यक्त करताना उद्धव ठाकरे यांना खुली ऑफर दिली.
उद्धव साहेब आमच्या सोबत या परंतु आमच्याकडे 2029 पर्यंत कोणतीच जागा शिल्लक नाही असेही सांगायला विसरले नाही.
सभागृहाच्या बाहेर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की सभागृहात निरोप समारंभाचे भाषण सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला ऑफर दिली परंतु ती ऑफर त्या वेळेपुरती मर्यादित होती. अशा गोष्टी सभागृहात घडत असतात, परंतु त्या तिथेच सोडून द्यावे लागतात असे उत्तर दिले.