बातमी
बापावर अंत्यसंस्कार करून दिली दहावीची परीक्षा
दहावीची परीक्षा हा टप्पा जीवनात खूप महत्त्वाचा असतो . अशावेळी आपला आधारवडच हरपणे आणि तेही परीक्षेच्या आदल्या रात्री हे कठीणच. मात्र, अशा कठीण परिस्थितीतही अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथील ऋषिकेश रामनाथ पुरी याने आपल्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी पित्याला साश्रुनयनांनी निरोप देत मराठीचा पेपर दिला. त्यामुळे अनेकांच्या डोळ्यात अश्रू तराळले होते.
शिक्षण विभागाने गावातच केली पेपर देण्याची सोय
दरम्यान, परीक्षा केंद्र दुसऱ्या तालुक्यात असल्याने बोर्ड, शिक्षण विभागाने गावातीलच केंद्रावर परीक्षेची सोय केली होती.