राजकारण
मनसेचे वसंत तात्या मोरे शरद पवारांच्या भेटीला; चर्चांना उधाण
पुण्यातील मनसेचे नेते वसंत तात्या मोरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारचे अध्यक्ष खा.शरद पवार यांची आज पुण्यात भेट घेतली.
पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी मनसेचे वसंत तात्या मोरे हे इच्छुक आहेत.ते नेमके कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी तयार आहेत हे मात्र गुलदस्त्यात आहे. आज खा.शरद पवार हे पुण्यात आले असताना वसंत मोरेंनी त्यांची भेट घेतली याप्रसंगी खा.सुप्रिया सुळे व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
कोण आहेत वसंत मोरे ?
वसंत मोरे हे पुणे जिल्ह्यातील मनसेचे एक आश्वासक चेहरा असून ते नेहमी लोकांच्या संपर्कात राहून त्यांच्या अडी – अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध असतात.त्यांच्या मागे कार्यकर्त्यांचे मोठे वलय असून ही त्यांची जमेची बाजू आहे.